वरणगाव फॅक्टरीत राजपूत समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न ऑ.फॅ.वरणगाव मधील वरणगाव मधील कम्युनिटी हॉलमध्ये राजपूत समाज उन्नती मंडळातर्फे गुणगौरव सोहळा सामाजिक सेवा व निवृत्त समाज बांधवांचा सत्कार उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रवीणसिंह राजपूत प्रदेशाध्यक्ष श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना,समाधान महाजन सर जिल्हाप्रमुख शिवसेना,नरेंद्रसिंग पाटील नगरसेवक मनपा जळगाव, सौ.तुप्ताताई महाजन नगरसेविका वरणगाव, प्रा.सौ संगीता पाटील चाळीसगाव, प्रा.सौ कल्पना पाटील,प्रमुख वक्ते प्रा.डॉ.काजल पाटील पाचोरा, विलाससिंग पाटील तालुकाप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस भुसावल, तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश संघटक विलाससिंह पाटील प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर राजपूत,भगवानसिंह खंडाळकर,जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग मोरे, संदीपसिंग राणा, सारिकाताई पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाला सुरुवातीस विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस दिप प्रज्वलन व पुष्पहार अपर्ण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना उज्वल भविष्य करीता शुभेच्छा देण्यात आले प्रमुख वक्ते प्रा. डॉ.काजल पाटील यांनी आपल्या भाषणात शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी व उच्च शिक्षणासाठी मोलाचे मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषणात प्रवीणसिंह राजपूत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान त्याच्या मेहनतीला मिळालेली समाजाची प्रेरणादायी पाऊल असून समाजाच्या प्रगतीसाठी युवकांनी पुढे येण्याचे व संघटित होण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंकज जाधव सूत्रसंचालन सत्यपालसिंग राजपूत आभारप्रदर्शन सुनिल पाटील सर यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सी.एल.पाटील, सचिव प्रवीण पाटील, स्वप्नील राजपूत, सौ वैशाली पाटील, बाबुलाल पाटील,चंचलसिंग राजपूत,स्वप्नील सोळंके, पवन पाटील सह समाजबांधव व महिलांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीतांनी झाली

