Wednesday, September 9, 2026
Homeजळगावतालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर!

तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर!

तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर!

प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत; २०२५ ते २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी यावल तालुक्यातील एकूण ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे महिला आरक्षण ८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले. यावलच्या तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांनी प्रवर्गनिहाय आरक्षणाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, अनुसूचित जमाती, नामाप्र, नामाप्र महिला, सर्वसाधारण तसेच सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गांचा समावेश आहे.अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी वनोली, दुसखेडे, न्हावी प्र. यावल आणि अंजाळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात निमगाव, किनगाव बु., मोहराळे आणि डांभुर्णी या ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे.अनुसूचित जमाती महिला प्रवर्गात कोरपावली, म्हैसवाडी, कासवा, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरादे, बोरावल खु. आणि चितोडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर अनुसूचित जमाती प्रवर्गात बारोळे, वड्री खु., कोसगाव, सांगवी खु., पिळोदे खु., पाडळसे, साकळी, हंबर्डी, पिळोदे बु., चिखली बु. आणि राजोरे या ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे.नामाप्र प्रवर्गासाठी भालोद, तर नामाप्र महिला प्रवर्गासाठी दहीगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद निश्चित करण्यात आले आहे.सर्वसाधारण प्रवर्गात चिखली खु., चिंचोली, शिरागड, सावखेडासीम, थोरगव्हाण, बोरावल बु., पिंपरुड, टाकरखेडे, हिंगोणे, आमोदे, सातोद, नायगाव, कासारखेडा, किनगाव खु., महेलखेडी आणि विरावली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अट्रावल, डोंगर कठोरा, सांगवी बु., नावरे, बारखेडा बु., डोंणगाव, न्हावी प्र. अडावद, वडोदे प्र. यावल, आडगाव, भालोद, चुंचाळे, पिंप्री, गिरडगाव, उंटावद, कोळवद आणि वढोदे प्र सावदा या ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे.

या आरक्षणामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आगामी राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता असून, संबंधित गावांमध्ये इच्छुक उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या हालचालींना सुरुवात होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीनिहाय आरक्षणाची अधिकृत माहिती तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या