शिवमुद्रा प्रतिष्ठान ‘भुसावळचा राजा’तर्फे यंदा साकारला भव्य ‘शिवदरबार’


भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : शिवमुद्रा प्रतिष्ठान ‘भुसावळचा राजा’ यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजेशाही वैभवाची अनुभूती देणारा भव्य ‘शिवदरबार’ साकारण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची संकल्पना आणि महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने शिवदरबाराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राजेशाही दरबार, किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक वातावरण यामुळे संपूर्ण देखावा भाविक व नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिकतेसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि संस्कार समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
हा भव्य देखावा साकारण्यासाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. ‘शिवदरबार’ पाहण्यासाठी भुसावळकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

