Sunday, September 20, 2026
Homeजळगावआंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप 

जळगाव, दि. १६ सप्टेंबर २०२६ : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. या योजनेंतर्गत समाज कल्याण विभागास एकूण २०८ प्रस्ताव प्राप्त झाले असून, यावर्षी उपलब्ध तरतुदीनुसार रु. ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

यामधून ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे., कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकार करिश्मा नायर यांचे हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.यावेळी संबंधित लाभर्थ्यांना करिश्मा नायर यांनी भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रभारी समाजकल्याण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते.

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन सामाजिक सलोखा, समता आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा भर आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या