मनुष्य जीवनातील प्रकाश स्तंभ म्हणजे शिक्षक – प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विविध शाखांमधील शिक्षकांचा शिक्षक गौरव सोहळा सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट,फैजपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य अनिल किरंगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज तथा सतपंथ संस्थानचे सचिव संजीव महाजन होते.
याप्रसंगी चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त चक्रधर स्वामींच्या प्रतिमेस व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपमुख्याध्यापिका सौ. मिनल नेमाडे यांनी स्वागत गीत सादर केले. आलेल्या पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन विनायक महाजन, अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र फालक, सेक्रेटरी गोपाळ पाटील व संचालकांनी केला. यानंतर शि.प्र.मंडळाचे संस्थाध्यक्ष सुनील महाजन, अनिल किरंगे तसेच जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त डी.आर.नेहेते, प्राचार्य एच.आर.ठाकरे, उपमुख्याध्यापिका मिनल नेमाडे, आय.टी.सी.प्राचार्य व्ही.के.भंगाळे या संस्थाप्रमुखांचा सत्कार महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. उर्वरित गुरुजनांचा सत्कार संस्था पदाधिकाऱ्यांनी यथोचितरित्या करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष सुनील महाजन, के.आर.पाटील, ११ वीची विद्यार्थिनी युक्ता नेमाडे, संजीव महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अनिल किरंगे यांनी गुरू प्रती आदर, निष्ठा याविषयीचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक किशोर बोरोले यांनी केले तर आभार शिक्षक प्रतिनिधी डी. आर. नेहते यांनी मानले. यावेळी संस्था संचालक दामोदर भंगाळे, सुरेश गारसे, मनोहर पाटील, खेमचंद्र पाटील, राजेंद्र पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी चिनावल मधील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विविध शाखांमधील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.

