Wednesday, September 23, 2026
Homeजळगावप्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी हरीभाऊ पाटील यांची निवड.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी हरीभाऊ पाटील यांची निवड.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी हरीभाऊ पाटील यांची निवड.

२५ सप्टेंबरला यावल येथे भव्य सत्कार सोहळा व मोफत सदस्य नोंदणी अभियान!

​यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.२३
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या यावल तालुकाध्यक्षपदी यशस्वी कार्य केल्यानंतर हरीभाऊ रत्नाबाई विजय पाटील यांची संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुक्याच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

​हा सत्कार सोहळा शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ, महालक्ष्मी मॉलच्या मागे, यावल येथे पार पडणार आहे.

​विशेष मोफत सदस्य नोंदणी अभियान – सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर वरिष्ठांच्या विशेष आदेशानुसार यावल तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींसाठी ‘निशुल्क सदस्य नोंदणी अभियान २०२६’ राबवले जाणार आहे. यामध्ये दिव्यांगांचे मोफत सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेतले जातील.

​आवश्यक आवाहन –
या कार्यक्रमास व नोंदणी अभियानास तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनी तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.सदस्य नोंदणीचा लाभ घेण्यासाठी येताना सर्वांनी आपली आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत आणावीत असे
​आयोजक प्रतीक पाटील
(तालुका उपाध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना,यावल) यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या