Wednesday, September 23, 2026
Homeजळगावविशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) : १३ प्रकारच्या विसंगतींसाठी आवश्यक कागदपत्रांची...

विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) : १३ प्रकारच्या विसंगतींसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती जाहीर.

विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) : १३ प्रकारच्या विसंगतींसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती जाहीर.

यावल,    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      दि. २३
विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) अंतर्गत मतदार यादीतील नाव,लिंग,वय, नातेसंबंध तसेच पूर्वीच्या मतदार यादीतील नोंदींमध्ये आढळणाऱ्या विविध विसंगती दूर करण्यासाठी संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत,असे आवाहन यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मागील SIR मतदार यादीशी जुळवणी करताना आढळलेल्या विसंगतीनुसार संबंधित मतदारांकडून पुरावे व कागदपत्रे मागविली जाऊ शकतात. त्यासाठी १३ प्रकारच्या विसंगतींची यादी देण्यात आली असून, प्रत्येक प्रकारानुसार कोणती कागदपत्रे उपयोगी ठरू शकतात,याची माहिती देण्यात आली आहे.
कोणत्या विसंगतीसाठी कोणती कागदपत्रे?
१) नाव,लिंग किंवा वयासंबंधी विसंगती असल्यास
आधार कार्ड,जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे प्रमाणपत्र,पासपोर्ट, PAN कार्ड आदी कागदपत्रे उपयोगी ठरू शकतात.
२) आई-वडील व मुलाच्या वयातील अंतर २५ वर्षांपेक्षा कमी असल्यास मुलाचा जन्म दाखला,आई-वडिलांचा जन्म किंवा वयाचा पुरावा,शाळा सोडल्याचा दाखला,कुटुंब नोंदवही आदी पुरावे सादर करता येतील.
३) आई-वडील व मुलाच्या वयातील अंतर ५० वर्षांपेक्षा अधिक असल्यास
मुलाचा व आई-वडिलांचा जन्म दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,दहावीचे प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही आदी कागदपत्रे अपेक्षित असू शकतात.
४) आजी-आजोबा व नातवाच्या वयातील अंतर ४० वर्षांपेक्षा कमी असल्यास नातवाचा जन्म दाखला,आई-वडिलांचा व आजी-आजोबांचा वयाचा पुरावा, कुटुंब नोंदवही आदी कागदपत्रे उपयोगी ठरू शकतात.
५) संशयास्पद वयाच्या फरकाने जोडलेले अनेक भाऊ-बहिण असल्यास संबंधित सर्व व्यक्तींचे जन्म दाखले,शाळा सोडल्याचे दाखले, दहावीचे प्रमाणपत्र व कुटुंब नोंदवही आदी पुरावे मागविले जाऊ शकतात.
६) मागील व सध्याच्या यादीत वयाची अशक्य प्रगती आढळल्यास जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी / बारावीचे प्रमाणपत्र तसेच मागील SIR मतदार यादीची प्रत उपयोगी ठरू शकते.
७) सध्याच्या मतदार यादीतील व्यक्ती वडिलांशी जोडलेली असून मागील SIR मध्ये आईशी जोडलेली असल्यास
जन्म दाखला,आई-वडिलांचे मतदार ओळखपत्र,शाळा सोडल्याचा दाखला,कुटुंब नोंदवही आदी कागदपत्रे सादर करता येतील.
८) सध्याच्या यादीत वडिलांशी जोडलेले नाव पूर्वी जोडीदाराशी जोडलेले असल्यास विवाह प्रमाणपत्र (असल्यास), पती /पत्नीचे मतदार ओळखपत्र, कुटुंब नोंदवही व संबंधित नात्याचा पुरावा आवश्यक ठरू शकतो. ९) एखाद्या व्यक्तीने असामान्यपणे जास्त वंशज असल्याचा दावा केल्यास
कुटुंब नोंदवही,संबंधित व्यक्तीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला व जुनी मतदार यादी आदी कागदपत्रे उपयोगी ठरू शकतात. १०) सध्याच्या यादीतील व मागील SIR मधील आई-वडिलांच्या तपशिलात फरक असल्यास आई-वडिलांचे मतदार ओळखपत्र,जन्म दाखला,शाळा सोडल्याचा दाखला, कुटुंब नोंदवही व जुनी SIR नोंद आदी पुरावे सादर करता येतील. ११) सध्याच्या व मागील SIR मध्ये वडिलांच्या नावात तफावत असल्यास
जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी / बारावीचे प्रमाणपत्र व वडिलांचे मतदार ओळखपत्र आदी कागदपत्रे उपयोगी ठरू शकतात.
१२) सध्याच्या व मागील SIR मध्ये नात्याच्या प्रकारात तफावत असल्यास जन्म दाखला, विवाह प्रमाणपत्र (लागू असल्यास), कुटुंब नोंदवही आणि संबंधित नातेवाईकाचे मतदार ओळखपत्र आदी पुरावे मागविले जाऊ शकतात. १३) सध्याच्या व मागील SIR मध्ये नातेवाईकाच्या नावात तफावत असल्यास
नातेवाईकाचे मतदार ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी/बारावीचे प्रमाणपत्र व कुटुंब नोंदवही आदी कागदपत्रे उपयोगी ठरू शकतात.
BLO कडून मतदारांसाठी महत्त्वाच्या १० सूचना
मतदारांनी मूळ कागदपत्रे आणि त्यांची छायांकित प्रत सोबत ठेवावी.शक्य असल्यास संबंधित विसंगतीशी थेट संबंधित कागदपत्रे सादर करावीत.
नाव,जन्मतारीख,पालकांचे नाव किंवा नात्यामध्ये तफावत असल्यास त्याचा पुरावा सोबत ठेवणे महत्त्वाचे आहे.मागील SIR मतदार यादीतील संबंधित नोंद उपलब्ध असल्यास तिची प्रत किंवा तपशीलही आणावा.
कुटुंबातील नाते सिद्ध करण्यासाठी जन्म दाखला, कुटुंब नोंदवही,शाळा सोडल्याचा दाखला यांसारखी उपयुक्त कागदपत्रे तयार ठेवावीत.
कागदपत्रांवरील नाव आणि मतदार यादीतील नाव वेगळे असल्यास नावातील तफावत स्पष्ट करणारा पुरावा सादर करावा. तसेच केवळ आधार कार्डवर अवलंबून न राहता उपलब्ध असलेली संबंधित कागदपत्रे सादर करावीत.
कागदपत्रे तपासणीसाठी BLO/ERO/AERO यांच्याकडे सादर करावीत. प्रत्येक प्रकरणाची कागदपत्रे संबंधित विसंगती नुसार स्वतंत्रपणे तपासली जाणार आहेत. खोटी किंवा चुकीची कागदपत्रे सादर करू नयेत मतदारांनी कोणतीही चुकीची, लबनावट किंवा खोटी कागदपत्रे सादर करू नयेत. संबंधित विसंगती दूर करण्यासाठी उपलब्ध असलेली योग्य व अधिकृत कागदपत्रेच सादर करावीत.

विशेष सूचना : ही यादी मार्गदर्शक स्वरूपाची
या प्रसिद्ध केलेल्या यादीतील कागदपत्रे ही नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शक उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष प्रकरणात नोटीस किंवा ERO-AERO यांनी मागितलेली कागदपत्रे अंतिम मानली जातील, अशी सूचना देण्यात आली आहे.
त्यामुळे मतदारांनी घाबरून न जाता आपल्या मतदार यादीतील नोंद तपासावी,संबंधित विसंगती असल्यास तिचा योग्य पुरावा तयार ठेवावा आणि BLO /संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कागदपत्रे सादर करावीत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या