१३१ रुग्णांची नेत्र तपासणी; ६४ जणांना मोतीबिंदूचे निदान, २१ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी जळगावला रवाना तापी व्हॅलीचा स्तुत्य उपक्रम .


भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या सामाजिक बांधिलकीतून समता फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली, श्री संत गाडगे बाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फेकरी येथील आरोग्य उपकेंद्रात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला फेकरीसह साकरी, निंभोरा बु. आणि परिसरातील नागरिकांनी तपासणी करून घेतली

शिबिराचे उद्घाटन रजनी सावकारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेकरी ग्रामपंचायतीच्या सरपंच चेतना भिरूड होत्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विवेक जोशी, मानद सचिव सुधाकर सनंसे, प्रा. आर. पी. जोशी, डी. सुधीर शर्मा, कुणाल गालफाडे, परेश शाह, रोटेरियन अजय मिसर, राम पंजाबी तसेच क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते

शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णाची प्रथम रक्तदाब, मधुमेह व वजनाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर तज्ज्ञांकडून नेत्र तपासणी करण्यात आली. एकूण १३१ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली या तपासणीत ६४ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले. निदान झालेल्या रुग्णांपैकी २१ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी समता फाउंडेशन टीम लीडर प्रवीण राठोड,
स्वयंसेवक सुरेंद्र पाटील कांताई नेत्रालय जळगाव
डॉ अदनान शेख यांनी
जळगाव येथील कांताई नेत्रालयात येथे नेले. उर्वरित पात्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी २९ सप्टेंबर रोजी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

फेकरी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. हर्षद वाजपेयी यांनी आरोग्यविषयक सहकार्य केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक कु. अदिती शर्मा, अवनी शर्मा, तेजस्विनी पटेल, कशिश यादव, आदर्श चौहान, निहाल परदेशी, सोहिल खान आणि हर्ष प्रधान यांनी रुग्णांची नोंदणी, व्यवस्था आणि मार्गदर्शनात सक्रिय सहभाग घेतला.तसेच फेकरी, साकरी आणि निंभोरा बु. परिसरातील आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांनी नागरिकांपर्यंत शिबिराची माहिती पोहोचवून लाभार्थी सहभागी करून घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

