Thursday, September 24, 2026
Homeआरोग्यदारासमोर झाड लावून तेथे गणेशाचे विसर्जन करत कायमस्वरूपी गणेशरुपी वृक्षदेवतेची स्थापना करावी...

दारासमोर झाड लावून तेथे गणेशाचे विसर्जन करत कायमस्वरूपी गणेशरुपी वृक्षदेवतेची स्थापना करावी डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

दारासमोर झाड लावून तेथे गणेशाचे विसर्जन करत कायमस्वरूपी गणेशरुपी वृक्षदेवतेची स्थापना करावी डॉ. सुरेंद्रसिंग पाटील*.                                                         भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर अनंत चतुर्दशी आपल्या जीवनात आपणास रिद्धी सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या घरोघर दिनांक 14 सप्टेंबर पासून विराजमान असलेल्या आपला सुखकर्ता ,दुखहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस रिद्धी जीवनात सुख-समृद्धी ,यश ,ऐश्वर्या देते धन धान्याची कमतरता भासू देत नाही तर सिद्धी कोणत्याही कारभार किंवा साधनेत पूर्णता देते, योग्य बुद्धी,शांतता, ज्ञान अलौकिक क्षमता प्राप्त करून देते गणराया भक्तांवर येणारी विघ्न, दुःख स्वतः हरण करत भक्तांना रिद्धी सिद्धीच वरदान देत आपल्यातील अहंकार,अज्ञानता दूर करत आपल्या जीवनात योग्य दिशा दाखवत शुद्ध मनाची बुद्धी प्रदान करणारी , सुख देणारी देवता श्री गणराया कुठलेही कार्य असो सर्वप्रथम वंदन श्री गणरायाचे अनंत चतुर्दशीला श्री गणेशजीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी आपल्या दारासमोर दीर्घकाळ टिकणारे झाड लावून तेथे घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन केल्याने मूर्तीची कुठलीही विटंबना न होता श्री गणेशजींचा अधिवास आपल्यात कायम राहील तसेच आपण जेव्हाही घराबाहेर निघू तेव्हा सर्वप्रथम आपोआप आपणास श्री गणेशाच्या रूपात आपण आपल्या दारासमोर लावलेल्या गणेशरुपी झाडाचे दर्शन होतं आपल्या कामास योग्य दिशा मिळण्यास मदत होईल तसेच आपल्या घरात येणारी दुःख, विघ्न हे गणेश रुपी झाड दुखहर्ता, विघ्नहर्ता रुपात आपल्या घराची रक्षा करत घरात रिद्धी सिद्धी च्या रूपात कायमस्वरूपी राहण्यास मदत होईल. जागा नसल्यास घरच्या घरी विसर्जन करून सदरची माती दीर्घकाळ टिकणाऱ्या झाडांजवळ विसर्जित करावी अथवा कुंडीत बिजारोपण करून रोप तयार करून पुढील वर्षी झाड लावावे अन्यथा योग्य जागा पाहून रोप लावावे डॉ. सुरेंद्सिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या