Monday, September 28, 2026
Homeजळगावयावल व फैजपूर काँग्रेसचा एल्गार: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'संवाद बैठकीत' संघटन मजबुतीवर...

यावल व फैजपूर काँग्रेसचा एल्गार: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘संवाद बैठकीत’ संघटन मजबुतीवर भर; पक्षप्रवेशाचा धडाका!

​यावल व फैजपूर काँग्रेसचा एल्गार: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘संवाद बैठकीत’ संघटन मजबुतीवर भर; पक्षप्रवेशाचा धडाका!

​यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि.२८
रविवार दि.२७ रोजी यावल येथे दुपारी यावल तालुका काँग्रेस कमिटी, यावल शहर काँग्रेस कमिटी आणि फैजपूर शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तालुका कार्यकर्ता संवाद बैठक’ मोठ्या उत्साहात पार पडली.
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

​प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन — ​या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलचे माजी आमदार रमेशदादा चौधरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रावेर-यावल मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी उपस्थित होते.बैठकीची प्रास्ताविक भूमिका यावल तालुकाध्यक्ष प्रशांत भगवान पाटील यांनी मांडली.

 

​संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा व निर्धार – ​बैठकीदरम्यान वक्त्यांनी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार कोणताही असो,कार्यकर्त्यांनी केवळ काँग्रेस पक्षाच्या विचारधारेसाठी आणि चिन्हासाठी एकजुटीने काम केले पाहिजे,असा सुर व्यक्त करण्यात आला.
​बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे —
​बूथ स्तरावर सक्रियता काँग्रेसची संघटना तळागाळातील आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून अधिक मजबूत करणे.
​समन्वय आणि जनप्रश्न : पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये योग्य समन्वय ठेवून गावागावातील नागरिकांच्या समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठवणे.
​युवा व निष्ठावंत कार्यकर्ते: सध्याच्या परिस्थितीला सामोरे जात अन्यायाविरोधात काँग्रेस पक्षाने सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.​

काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘जाहीर पक्षप्रवेश– या संवाद बैठकीदरम्यान विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर विश्वास दाखवत जाहीर पक्षप्रवेश केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
​मान्यवरांची मोठी उपस्थिती:
​या बैठकीस पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी, जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी,विलासशेट तायडे, यावल शहराध्यक्ष हकीम शेट, फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई, महिला तालुकाध्यक्ष कल्पना ताई तायडे,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल कोळी यांसह सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक,सरपंच आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने उतरणार असून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचा ठाम निर्धार या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या