Monday, September 28, 2026
Homeजळगावमाकडाच्या उडीने खाली पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

माकडाच्या उडीने खाली पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

माकडाच्या उडीने खाली पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील वनोली-कोसगाव परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थ त्रस्त असतानाच माकडाच्या उडीमुळे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कौशल्याबाई साहेबराव पाटील यांचा २७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी माकडाने अंगावर उडी मारल्याने कौशल्याबाई खाली पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर जळगाव येथे आठ ते दहा दिवस उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, वनोली-कोसगाव परिसरात माकडांचे कळप वारंवार गावात शिरत असून घरांच्या छतांवर तसेच घरांमध्येही घुसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन सूचना देतात; मात्र माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

पत्रकार अरुण पाटील यांनी आमदार अमोल जावळे यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत यांच्याशी संपर्क साधून वनाधिकारी स्वप्निल फटांगरे यांना परिस्थितीची माहिती दिली. येत्या आठ दिवसांत माकडांचा बंदोबस्त करून त्यांना इतरत्र हलविण्याची उपाययोजना करावी, अन्यथा वरिष्ठ स्तरावर दाद मागण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.तसेच मृत कौशल्याबाई पाटील यांच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या