हतनूर धरणाचा अतिरिक्त विसर्ग आज दुपारी ३ वाजता बंद
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवक घटली आहे. धरणात १०० टक्के पाणीसाठा करण्यासाठी पाणीपातळी २१४.०० मीटरपर्यंत नेणे आवश्यक असल्याने धरणाच्या वक्र दरवाजांद्वारे तसेच कालव्याद्वारे सुरू असलेला अतिरिक्त पुराच्या पाण्याचा विसर्ग आज दुपारी ३ वाजता बंद करण्यात येणार आहे.
धरणाची पाणीपातळी २१४.०० मीटरपर्यंत पोहोचल्यानंतरही जलसाठ्यात पाण्याची आवक सुरू राहिल्यास पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यकतेनुसार धरणातून तापी नदीच्या पात्रात विसर्ग सोडण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विसर्गाबाबतची पुढील माहिती वेळोवेळी संबंधित ग्रुपवर कळविण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

