Friday, October 2, 2026
Homeआंदोलनरावेर तहसील समोर केळी उत्पादक शेतकऱ्यांतर्फे केळी पीक विमासाठी आंदोलन

रावेर तहसील समोर केळी उत्पादक शेतकऱ्यांतर्फे केळी पीक विमासाठी आंदोलन

रावेर तहसील समोर केळी उत्पादक शेतकऱ्यांतर्फे केळी पीक विमासाठी आंदोलन

 

रावेर    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     येथे महात्मा गांधी जयंती निमित्त तहसील कार्यालयासमोर केळी उत्पादक शेतकऱ्यांतर्फे केळी पीक विम्याची महसूल मंडळ जाहीर करणे, मंजूर रक्कम खात्यात टाकणे,वगळलेले क्षेत्र नियमित करणे या संदर्भात दखल घे यासाठी “गांधीजी भजन आंदोलना”चे आयोजन करण्यात आले होते. या आमच्या आंदोलनास तालुकाभरातील शेतकरी व मान्यवर उपस्थित होते. या आंदोलनास्थळी तहसीलदार श्री संजय तायडे साहेब, AIC पिक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री अमित पवार, तालुका कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब वाळके साहेब यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी रावेर तालुक्यातील पात्र महसूल मंडळांची यादी उपस्थित शेतकऱ्यांना देत आठवडाभरात १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्यात येणार असून ज्यांचे क्षेत्र कमी दिसत असल्याच्या तक्रारी आहेत या १३हजार शेतकऱ्यांच्या खात्यांची प्रोसेसिंग सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगत आंदोलन थांबवण्याची विनंती केली. या सोबतच ज्या शेतकऱ्यांचे खात्यात पैसे पडणार नाहीत त्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी ०३ कर्मचाऱ्यांची रावेर येथे विमा कंपनीच्या कार्यालयात नियुक्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. त्यांनी मागण्या मान्य केल्याने आंदोलन स्थळी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत आंदोलन थांबविले.
यावेळी आंदोलनाला युवा शेतकरी सुनिल कोंडे यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवा नेते श्री धनंजय भाऊ चौधरी माजी जि प सदस्य रमेश पाटील,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री योगीराज पाटील,कृ.उ.बा. समितीचे माजी सभापती सचिन पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश चिंधू पाटील, डॉ राजेंद्र पाटील, डॉ सुरेश पाटील,काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री वाय एस महाजन सर,श्री धुमाभाऊ तायडे,माजी पं.स.श्री दिपक पाटील,श्री.दिलरुबाब तडवी, श्री गुणवंत भंगाळे,श्री सुधीर मोरे,श्री योगेश कोळंबे,श्री विवेक बोंडे सर,श्री. डिगंबर नेहेते,श्री.गोपाळ भिरुड,श्री.विष्णू भिरुड,श्री सुनील ब-हाटे,श्री. हेमराज पवार,श्री संदीप भिरुड,श्री मधुकर पाटील, तांदळवाडीचे श्री शशांक पाटील,श्री श्रीकांत चौधरी,श्री संतोष पाटील,यांसह तालुकाभरातून शेतकरी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या