वरणगावच्या ‘गणराया अवॉर्ड २०२६’मध्ये स्वामी विवेकानंद गणेश मित्र मंडळ प्रथम !
किसान मित्र मंडळ द्वितीय; शिवरथ व जागृती मित्र मंडळाला तृतीय क्रमांक
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव, ता. भुसावळ :

श्री गणेशोत्सव २०२६ च्या विसर्जन मिरवणुकीत समाजप्रबोधनात्मक देखावे, पारंपरिक वाद्यांचा वापर, कवायतींचे प्रदर्शन आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा ‘गणराया अवॉर्ड २०२६’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. वरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यात सावकार गल्ली येथील स्वामी विवेकानंद गणेश मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या मंडळाचा गौरव करण्यात आला. गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि सामाजिक संदेश देणाऱ्या पद्धतीने साजरा करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कारप्राप्त गणेश मंडळे –
प्रथम क्रमांक : स्वामी विवेकानंद गणेश मित्र मंडळ, सावकार गल्ली, वरणगाव.द्वितीय क्रमांक : किसान मित्र मंडळ, चौधरी वाडा, वरणगाव.तृतीय क्रमांक : शिवरथ मित्र मंडळ, जुनी पोस्ट गल्ली, जागृती मित्र मंडळ, सिद्धेश्वर नगर, वरणगाव.उत्तेजनार्थ पुरस्कार सार्वफुले गणेश मित्र मंडळ, मोठा माळी वाडा, शिवराजे मित्र मंडळ, पिंपळमळा ,मजदूर मित्र मंडळ, भवानी नगर.
‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमांतर्गत गौरव : –
बाल गणेश मित्र मंडळ, करंजी.
न्यू आदर्श गणेश मित्र मंडळ, मानपूर.गणराया अवॉर्डच्या माध्यमातून गणेश मंडळांनी धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक प्रबोधन, पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि शिस्तबद्ध मिरवणुकीचा आदर्श जोपासावा, हा संदेश देण्यात आला. पुरस्कारामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले असून वरणगावातील गणेशोत्सवाच्या सकारात्मक परंपरेला अधिक बळ मिळाले आहे.

