Tuesday, October 13, 2026
Homeजळगावयावल पंचायत समितीत घेण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत दोघ आमदार संतापले,

यावल पंचायत समितीत घेण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत दोघ आमदार संतापले,

यावल पंचायत समितीत घेण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत दोघ आमदार संतापले,
दोन ग्राम सेवक गैहजर, बीडीओंना सुनावले खडेबोल, पुन्हा पत्रकारांना आमंत्रण नाही
यावल         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     : यावल पंचायत समितीत सोमवारी घेण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत दोघ आमदार पंचायत समिती प्रशासनावर चांगलेचं संतापले. बैठकीत केवळ ऑफीस मध्ये बसुन अहवाल तयार करून तो सादर करून चालणार नाही, गावा गावात जावुन या दुष्काळ परिस्थिती आढवा घ्या अशा शब्दात कानउघडणी करण्यात आली तर दुष्काळ परिस्थितीसाठीच्या या बैठकीत दोन ग्राम सेवक गैरहजर होते तेव्हा बीडीओंना देखील खडेबोल सुनावले व त्यांच्यावर कारवाईच्या सुचना केल्या तर गेल्या आढावा बैठकीप्रमाणे या बैठकीचे पुन्हा पत्रकारांना आमंत्रण दिले नव्हते व आमदारांनी पत्रकारांना बोलवले होते
यावल येथील पंचायत समितीमध्ये तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रावेर आमदार अमोल हरिभाऊ जावळे, चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती. दरम्यान आढावा घेतला मात्र, यात तालुक्यात झालेल्या पावसाची टक्केवारी ७९ टक्के सांगण्यात आली तर आमदारांना सादर केलेल्या पत्रात पावसाची टक्केवारी वेगळीच होती तसेच तुर्त तालुक्यात कुठेच पाणीटंचाई नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजेंद्र गिरी यांनी सांगीतले. तर याच दरम्यान बैठकीत उपस्थित ग्रामसेवकांना शिरसाड, हंबर्डी आणि दहिगाव या गावात याच वर्षी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली तेव्हा सादर केलेला आढावा व येथे उपस्थित ग्रामसेवक देत असलेली माहिती यात विसंगती दिसत असल्याने दोन्ही आमदार चांगलेचं संतापले व त्यांनी गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांना खडेबोल सुनावले, तसेच सर्व ग्रामसेवक आले आहेत का? असे विचारले असता दोन ग्रामसेवक गैरहजर असल्याचे दिसुन आले तेव्हा बीडीओ म्हणुन तुमचा प्रशासनावर वचक नाही का?, असे देखील आमदारांनी बिडीओ डॉ. गायकवाड यांना सुनावले तर अनुपस्थित ग्रामसेवकांवर कारवाई केली जाईल असे बीडीओ गायकवाड यांनी सांगितले या बैठकीमध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, माजी सभापती नारायण चौधरी, सूर्यभान पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी, यावल नगरपालिकेच्या भाजपा गटनेता नंदाताई महाजन, उमेश फेगडे, भरत चौधरी सह ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी व विविध गावाचे सरपंच, सदस्य, प्रशासक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सपकाळे यांनी केले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या