Tuesday, October 13, 2026
Homeजळगावयावलच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत, कंत्राटदार व सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्याची...

यावलच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत, कंत्राटदार व सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

यावलच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत, कंत्राटदार व सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र चतुर्थ श्रेणी व सफाई कर्मचारी संघटनेचे निवेदन
यावल      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     : यावल नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन कामासाठी कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे वेतन थकीत ठेवल्याप्रकरणी तसेच कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदार व जबाबदार व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार तात्काळ गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र चतुर्थ श्रेणी व सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना तक्रार निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार, यावल नगरपालिकेत ‘दिशा एजन्सी, पुणे’ यांच्यामार्फत घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राटी काम सुरू आहे. या कामांतर्गत अनेक सफाई कामगार शहरातील रस्ते, गटारी व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे काम नियमितपणे करत आहेत. परंतु, कंत्राट संपुष्टात आले असूनही मागील तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन देण्यात आलेले नाही. यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.प्रमुख मागण्या व आरोप:
वेतन व वैधानिक लाभ: कर्मचाऱ्यांना नियमानुसार किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (EPF), कर्मचारी राज्य विमा (ESIC) व इतर कायदेशीर लाभ मिळाले आहेत की नाही, याची कामगार विभागामार्फत चौकशी करण्यात यावी.कंत्राटदार व सुपरवायझरवर कारवाई: दिशा एजन्सी (पुणे), कंत्राटदार वैभव डोंबरे, सचिन केंद्र आणि सुपरवायझर ज्ञानेश्वर बालाजी मगर (माऊली मगर) यांच्या चौकशीची व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.लेखी माहितीची मागणी: या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती संघटनेला लेखी स्वरूपात देण्यात यावी. आमरण उपोषणाचा इशारा:निवेदन प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत या तक्रारीवर गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर कारवाई न झाल्यास, संघटनेच्या वतीने यावल पोलीस स्टेशन किंवा संबंधित कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन अथवा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या तक्रार निवेदनावर अखिल महाराष्ट्र चतुर्थ श्रेणी व सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवाल आणि जिल्हाध्यक्ष शितलकुमार धारू यांच्या सह्या आहे.-पुर्ण-फोटो आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या