वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
रावेर तालुका खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

रावेर : पी. एम. श्री. जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्र. १, रावेर येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ व मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून वाचनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानात भर पडावी आणि नियमित वाचनाची सवय लागावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या जीवनातून विद्यार्थ्यांना ज्ञान, मेहनत आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
वाचन हीच ज्ञानाची गुरुकिल्ली असून, वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही वाचनात सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आरिफ सर होते तसेच यशस्वीते साठी अ सलाम सर अजिज सर विकार सर मुख्तार सर गुलरेज सर इरफान सर नावेद सर निदा आफरीन मॅडम व अंशकालीन शिक्षक अजहर सर यांनी परिश्रम घेतले

