Friday, October 16, 2026
Homeजळगावसाने गुरुजी विद्यालयाच्या विकासासाठी ४०.०८ लाखांच्या कामांचे भूमिपूजन

साने गुरुजी विद्यालयाच्या विकासासाठी ४०.०८ लाखांच्या कामांचे भूमिपूजन

साने गुरुजी विद्यालयाच्या विकासासाठी ४०.०८ लाखांच्या कामांचे भूमिपूजन

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या हस्ते विकासकामांना सुरुवात

यावल      खानदेश लाईव्ह न्युज  प्रतिनिधी      दि.१६   वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्यात येत असून याच अभियानांतर्गत यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे ४०.०८ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

साने गुरुजी विद्यालयाच्या पूर्वेकडे गेट व्हावे ही मागणी नागरिकांसोबत पालकांनी व विद्यार्थिनी यांची होती… मागील बाजूच्या गेट मुळे मुलींची छेडछाड असे प्रकार घडले होते. नागरिकांच्या व विद्यार्थिनींच्या या मागणीची दखल घेत सौ. छायाताई अतुल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार आता या नवीन प्रवेशद्वाराच्या कामाला सुरुवात होत आहे.

यासोबतच संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करून शाळेला नवे रूप देणे, विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम उभारणे तसेच लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य बसविणे, अशा विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांमुळे शाळेच्या परिसराचा विकास होण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील, शिक्षण सभापती पराग भाऊ सराफ, नगरसेवक सागर भाऊ चौधरी, नगरसेवक निसार शेख, नगरसेविका वैशालीताई बारी, समीर खान,मजहर भाई, करीम मन्यार,निलेश बारी, बांधकाम अभियंता शेळके साहेब मुख्याध्यापक एम के पाटील सर, काटकर सर, इंगळे सर, नन्नवरे सर, फेगडे सर, नितीन बारी यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावल शहराच्या सौंदर्यात भर घालणारी विविध विकासकामे

याच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत यावल शहरात अन्य महत्त्वाची विकासकामेही हाती घेण्यात येणार आहेत. बसस्थानक परिसरात वॉटर एटीएम उभारणे, बोरावल गेट परिसरातील शिवतीर्थ येथे शेतकरी शिल्प उभारणे, फैजपूर–चोपडा रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये आकर्षक शिल्प उभारणे, कलाकार कट्टा विकसित करणे, इनडोअर जिमची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच वृक्षारोपण करणे, अशा विविध कामांचा यात समावेश आहे.

या विकासकामांमुळे यावल शहरातील नागरिकांना नवीन सुविधा मिळण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. शैक्षणिक सुविधांपासून ते सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणापर्यंत विविध कामांचे नियोजन करण्यात आल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या