Friday, November 6, 2026
Homeजळगावजे.टी.महाजन विद्यालयात नवरात्रोत्सव आणि दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा.

जे.टी.महाजन विद्यालयात नवरात्रोत्सव आणि दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा.

जे.टी.महाजन विद्यालयात नवरात्रोत्सव आणि दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा.

यावल      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.१९
येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्री व दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन यांनी स्वीकारले. यावेळी इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या दीपाली धांडे तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका गौरी भिरूड,राजश्री लोखंडे यांची उपस्थिती होती.

रंजना महाजन मॅडम यांनी सरस्वती पूजन करून प्रतिमेला हार व पुष्प अर्पण केले. कार्यक्रमात देवीची नऊ रूपे विद्यार्थिनींनी साकारली.नंतर कन्यापूजन करण्यात आले व नंतर दांडिया खेळण्यात आला.
त्यानंतर प्राचार्या रंजना महाजन यांनी नवरात्री विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले.तसेच रुचिता पाटील यांनी दसरा विषयी माहिती सांगितली.
आणि अर्चना पाटील यांनी दसरा विषयी कविता सादर केली.
सर्वात शेवटी विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून रावणाचे दहन केले.रावणाचे दहन होत असताना सर्व विद्यार्थ्यांनी खोटे बोलणे,आळस,राग,मत्सर, अहंकार,अपमान करणे,भांडण, स्वार्थ,निष्काळजीपणा व अस्वच्छता या दुर्गुणांचेही दहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.अशा प्रकारे मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या