Tuesday, October 27, 2026
Homeजळगावजिल्हा बँक निवडणुक; मंदार पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज

जिल्हा बँक निवडणुक; मंदार पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज

जिल्हा बँक निवडणुक; मंदार पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज

महायुतीकडून आहेत इच्छुक
राजकीय क्षेत्रात खळबळ

रावेर    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता सर्वांचे लक्ष रावेर तालुक्यातून उमेदवारी कोणाला मिळेल याकडे लागले. महायुतीतून उमेदवारी मिळवण्यासाठी माजी आमदार अरुणदादा पाटील यांचे पुतणे तथा बाजार समिती संचालक मंदार पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज जळगाव जिल्हा बँकेतुन घेतला आहे. मंदार पाटील महायुतीतून भाजपा तर्फे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील यांचा सोपा वाटणारा विजय त्यांना पाठिंबा जाहिर करून नंतर धनशक्तीच्या जोरावर प्रतिस्पर्धीत उमेदवाराने माजी आमदार अरुण पाटील यांचा एका मताने पराभव झाला होता.याची तालुकासह जिल्हाभर चर्चा रंगली होती. मागील पाच वर्षात बरीच घडामोडी घडल्या आहे.माजी आमदार अरुण पाटील,मंदार पाटील आपल्या कार्यकर्त्यासह भाजपमध्ये जाऊन कृषी उपन्न बाजार समिती भाजपकडे आणली आहे.

भाजपा कडून अद्याप माजी आमदार अरुण पाटील किंवा त्यांचे पुतणे मंदार पाटील यांना अपेक्षित पुनर्वसन केले नाही काही पत्रकारांचा अंदाज आहे की यावेळची रावेर तालुक्यातून उमेदवारी मंदार पाटील यांना मिळण्याचा अंदाज आहे.याचे प्रमुख कारण म्हणजे माजी आमदार अरुण पाटील यांचा सहकार क्षेत्रात चांगली पकड आहे. यावेळचे वातावरण चांगले असून अनेक मतदारांनी मंदार पाटील यांना पाठिंबा देखिल दर्शविला असल्याचे त्यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याचा अंदाज आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या