Thursday, November 5, 2026
Homeगुन्हापोलनपेठेत दुकानफोडी; ६४ हजारांची रोकड चोरी, तीन संशयित सीसीटीव्हीत कैद!

पोलनपेठेत दुकानफोडी; ६४ हजारांची रोकड चोरी, तीन संशयित सीसीटीव्हीत कैद!

पोलनपेठेत दुकानफोडी; ६४ हजारांची रोकड चोरी, तीन संशयित सीसीटीव्हीत कैद!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – पोलनपेठ परिसरात चोरट्यांनी बंद दुकानाला लक्ष्य करत ६४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी चॅनेल गेट वाकवून मागील बाजूच्या लाकडी दरवाजाची कडी कापली आणि दुकानात प्रवेश करून रोकड चोरून नेली.

या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.पोलनपेठ परिसरातील कनक फूट वेअर हे दुकान रात्रीच्या वेळी बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाला लक्ष्य केले. सर्वप्रथम दुकानाचे लोखंडी चॅनेल गेट वाकवून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या लाकडी दरवाजाची कडी कापून चोरटे दुकानात शिरले. दुकानात ठेवलेली ६४ हजार रुपयांची रोकड घेऊन त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.या प्रकरणी सुयोग गजानन परिहार (३५, रा. सदोबानगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता तीन संशयित चोरटे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. संशयित दुकानाजवळ पायी येताना आणि चोरीनंतर परत जाताना फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या