गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम ; 13 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार पोलिसांची दंबग कारवाई
जळगांव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला.
आरोपींकडून तब्बल सात गावठी कट्टे, 46 जिवंत काडतूस तसेच सात लाख रुपये किंमतीची वाहने, दिड लाखांचे मोबाईल असा एकूण 13 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी भाविन गणेशभाई वरिया (26, रा. प्लॉट नं. 35, मनीषा सोसायटी, साईपूजन, जुना कोसाड रोड, चौरसी, सुरत, गुजरात) याच्या ताब्यातून दोन कट्टे, ब्रिजेशभाई सतीशभाई जानी (37, रा. कर्मचारी नगर, डेेडियापाडा, जि.नर्मदा, गुजरात) याच्या ताब्यातून एक कट्टा व 39 काडतूस, राहुल वाल्मिक सूर्यवंशी (चौधरी) (26, रा. प्लॉट नं. 243/7, देवपूर बसस्थानकासमोर, दुर्गामाता मंदिराजवळ, धुळे) याच्या ताब्यातून एक कट्टा व दोन काडतूस, जयेश निंबा पाटील (राजपूत) (30, रा.सारंगखेडा, ता.शहादा, जि.नंदुरबार, हल्ली मुक्काम अशोकनगर, सातपूर, नाशिक) यांच्या घरातून एक कट्टा तसेच एक पसार आरोपीच्या घरातून एक कट्टा व दोन जिवंत काडतूस असा एकूण चार लाख 55 हजार रुपये किंमतीचे सात देशी कट्टे व 92 हजार रुपये किंमतीचे 46 जिवंत काडतूस, सात लाखांची वाहने, दिड लाखांचे मोबाईल असा एकूण 13 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरम्यान, या टोळीतील गावठी कट्टे व जिवंत काडतुसे खरेदी-विक्री करण्यासाठी मदत करणारे तसेच प्रत्यक्ष सहभाग असलेले पुढील पाच आरोपीही तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. गोपाल उर्फ सागर हिरामण ठाकरे (28, रा.हनुमान मंदिराजवळ, डोंगरगाव, ता. शहादा), राहुल सुरेश मोरे (21, रा.खेडदीघर, ता.शहादा), लकी उर्फ कमलेश संजय पाटील (19, रा. वॉर्ड क्रमांक सात, शेवटची गल्ली, धानक मोहल्ला, पानसेमल, जि. बडवाणी, मध्य प्रदेश), भूषण राजू चौधरी (26, रा.नाथ गल्ली, खलवाडी मोहल्ला, सेंधवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश), हरीष उर्फ सन्नी कैलास चौधरी (24, देवपूर बसस्थानकासमोर, दुर्गामाता मंदिराजवळ, धुळे) यांना अटक करण्यात आली तर गुन्ह्यातील इतर पसार साथीदारांचा शोध सुरू आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, दत्तात्रय बागल, जितेंद्र पाडवी, मुकेश तावडे, दिनेश वसुले, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोलीस अंमलदार मनोज महाजन, अभय राजपूत, भरत उगले, विनोद पाटील, हेमंत बारी, रामेश्वर चव्हाण, रवींद्र अहिरे आणि रोहिणी धनगर यांनी केली.

