Thursday, November 5, 2026
Homeजळगावस्वच्छ पर्यावरणासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा – प्राचार्य सी. जे. तायडे

स्वच्छ पर्यावरणासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा – प्राचार्य सी. जे. तायडे

स्वच्छ पर्यावरणासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा – प्राचार्य सी. जे. तायडे

विद्यार्थ्यांना फटाक्यांऐवजी पुस्तकांच्या वाचनातून दिवाळीचा आनंद लुटण्याचे आवाहन

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज      प्रतिनिधी |

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहेत. भविष्यात पाणीटंचाईसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुष्काळामागील कारणांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी यावर्षी सर्वांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सी. जे. तायडे यांनी केले.

महात्मा गांधी विद्यालयात पर्यावरणपूरक दिवाळी व प्रदूषणाचे दुष्परिणाम या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्याध्यापक डी. आर. कोळंबे, पर्यवेक्षक सी. पी. चौधरी, विज्ञान शिक्षक सुनील वानखेडे आदी उपस्थित होते.

यावेळी दिवाळीचे महत्त्व विशद करताना विज्ञान शिक्षक सुनील वानखेडे म्हणाले की, सण-उत्सव साजरे करताना त्यामागील वैज्ञानिक कारणे विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजेत. दिवाळीच्या निमित्ताने घराची स्वच्छता केली जाते, त्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य मिळते. मात्र, फटाके फोडल्यामुळे वायू, ध्वनी आणि जलप्रदूषण होते. त्याचा मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फटाक्यांवर खर्च करण्याऐवजी पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करावी. तसेच विविध ज्ञानवर्धक पुस्तकांचे वाचन करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्याध्यापक डी. आर. कोळंबे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत घरातील कामांमध्ये आईला मदत करण्याचे आवाहन केले. घरातील कामे केल्याने श्रमाचे महत्त्व समजते आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. सुट्टीचा आनंद घेतानाच खेळ, मनोरंजनासोबत आगामी शैक्षणिक अभ्यासालाही वेळ द्यावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश पाटील यांनी केले, तर आभार टी. एम. तडवी यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या