Thursday, November 5, 2026
Homeजळगावमुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा भुसावळ दौरा घरकुल व जलतारा योजनांचा...

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा भुसावळ दौरा घरकुल व जलतारा योजनांचा आढावा; कामांना गती देण्याचे निर्देश

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा भुसावळ दौरा
घरकुल व जलतारा योजनांचा आढावा; कामांना गती देण्याचे निर्देश
जळगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   , दि. 5 नोव्हेंबर 2026 : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवार दि 5 नोव्हेंबर रोजी भुसावळ तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवक, विस्तार अधिकारी तसेच पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी ग्रामीण भागातील घरकुल योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित घरकुलांची कामे, जलतारा उपक्रमाची अंमलबजावणी तसेच इतर विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळेल, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील स्वच्छता, आरोग्य सुविधांची उपलब्धता तसेच आरोग्यविषयक विविध बाबींची पाहणी केली. आरोग्य केंद्रातील परिसर व रुग्णसेवेशी संबंधित व्यवस्थेचा आढावा घेत त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्यासह रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
ग्रामीण भागातील विकासकामे आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेण्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी भर दिला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या