पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडा; कास्ट्राईब महासंघाची आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे मागणी

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नागपूर येथे होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनात पदोन्नतीमधील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधावे आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधिमंडळात ठोस भूमिका मांडावी, अशी मागणी जळगाव कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे वतीने, चोपडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे .
कास्ट्राईब कर्मकर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य मा .कृष्णा इंगळे यांचे आदेशान्वये तसेच राज्यकार्याध्यक्ष गणेश जी माडावी व राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ , नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे यांचे मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे अनुसूचित जमाती या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात . ही मोहीम सर्व राज्यभर सुरू करण्यात आली . राज्यातील राखीव अनुसूचित जाती, जमाती या राखीव मतदारसंघातील आमदाराना तसेच मंत्र्यांना या निवेदनातून साकडे घालण्यात आली आहे . अनुसूचित जाती जमाती व भटक्या विमुक्त आदि अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नती २०२१ पासून शुल्क कारणाने या सरकारने थांबविल्या आहेत. त्यामुळे राज्यातील पदोन्नतीतील मधील अनुशेष बरेच प्रलंबित आहे. तसेच जुनी पेन्शन लागू करण्याबाबत आणि इतर विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबतीत. याकरिता येत्या २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या एकदिवसीय धरणे आंदोलनात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवने यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले. निवेदन देताना यावेळी पुलकेशी केदार जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विज्ञान सैंदाणे, प्रा. प्रमोद लोंढे सर, कोषागार विभागाचे रवींद्र गायकवाड, महसूल विभागाचे योगेश अडकमोल, महेश सपकाळे ,रुपेश ठाकूर पाटबंधारे विभागाचे, सचिन सपकाळे, जिभाऊ हटकर, कृषी विभागाचे वसंत सोनवणे, किशोर मैराळे, मनपाचे सुरेश भालेराव, नंदू गायकवाड आदि उपस्थित होते .

