जळगावात रंगभूमी दिन उत्साहात साजरा; बालगंधर्व नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर…

जळगाव / खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे रंगभूमी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त रंगभूमीवरील साहित्याचे पूजन, नटराज मूर्तीची पूजा, पारंपरिक नांदी गायन आणि नाटिका सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी दिली. तसेच नूतनीकरणानंतर नाट्यगृहाचे भाडे सर्वसामान्य रंगकर्मींना परवडणारे राहील, असे आश्वासन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक हर्षल मावळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या व नियामक मंडळ सदस्या गीतांजली मीराप्रल्हाद ठाकरे, कलावंत तुषार वाघुळदे यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते रंगमंच, वाद्ये, नाट्यसंहिता, रंगपेटी आणि नटराज मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे भारतमातेची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी ‘पंचतुंड नररुंडमालधर…’ या पारंपरिक नांदीचे गायन दुष्यंत जोशी, यश देशपांडे, खुशी बागूल आणि प्रणाली बाविस्कर यांनी केले. त्यांना तबल्यावर दर्शन गुजराथी यांनी साथसंगत केली. उपस्थित मान्यवरांनीही नांदी गायनात सहभाग घेतला.
*नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी रंगकर्मींच्या विविध मागण्या*

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गीतांजली ठाकरे यांनी रंगभूमीच्या विकासासाठी आवश्यक सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेल्या दोन टक्के निधीतून बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रंगकर्मींच्या वतीने करण्यात आली.

बालगंधर्व नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना सर्वांत खालच्या मजल्यावर वाहनतळ, त्यावरील मजल्यावर व्यावसायिक दुकाने आणि सर्वांत वरच्या मजल्यावर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी संकल्पना लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या…या कार्यक्रमाचे दमदारव विशेष शैलीत सूत्रसंचालन कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे यांनी केले..👍🎤💐🌹🙏

