भुसावळ येथे नूर खानदेश ट्रस्टची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

जिल्ह्यातील १७ प्रशिक्षण केंद्रांच्या कामकाजाचा आढावा; सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना गती देण्यावर चर्चा
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
नूर खानदेश ट्रस्ट, मुंबई व मेमन जमात यांच्या संयुक्त सहकार्याने १० नोव्हेंबर रोजी भुसावळ येथे ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील १७ ठिकाणी सुरू असलेल्या शिवणकाम व संगणक प्रशिक्षण केंद्रांच्या समन्वयकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व प्रशिक्षण केंद्रांच्या कामकाजाचा, विविध उपक्रमांचा तसेच प्रशिक्षणाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यासोबतच केंद्रांचा विकास, विस्तार आणि भविष्यातील सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांना अधिक गती देण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.
बैठकीत सर्व प्रशिक्षण केंद्रांच्या सद्यस्थितीची माहिती सादर करण्यात आली. केंद्रांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी उपस्थित समन्वयकांनी विविध सूचना मांडल्या. यावेळी भुसावळ येथे निर्माणाधीन असलेल्या ट्रस्टच्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचाही आढावा घेण्यात आला. ट्रस्टचे पदाधिकारी वासित सर (मुंबई) आणि मोहम्मद खालिद सर यांनी उपस्थित समन्वयकांना मार्गदर्शन करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ऑनलाइन इंडिया मेमन जमात व भोपाल यांच्या सहकार्याचेही कौतुक करण्यात आले.
या बैठकीस इलियास सर (मुंबई), साजिद सर (जळगाव), शरीफ अहमद (जामनेर), हसनुद्दीन (जामनेर), आबिद हुसेन (जळगाव), मोहम्मद रफीक (भुसावळ), जावेद इकबाल (जळगाव), असलम खान (सावदा), सय्यद इकरामुल्लाह (भुसावळ), मुजीब अशफाक बेग, सलीम खान, मिर्जी अल्ताफ (भुसावळ), अरशद खान (फैजपूर), रेहान सर (रावेर), मुश्ताक सर (रावेर), नजीम खान (धरणगाव), निजामुद्दीन (धरणगाव) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महिला, युवक आणि गरजू घटकांना शिवणकाम व संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि सामाजिक कार्यांचा विस्तार करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.

