Thursday, November 19, 2026
Homeजळगावकिन्ही येथे दुष्काळग्रस्त शेतमजूर व गरजू कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप!

किन्ही येथे दुष्काळग्रस्त शेतमजूर व गरजू कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप!

किन्ही येथे दुष्काळग्रस्त शेतमजूर व गरजू कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप!
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला; दिवाळीच्या सणात गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा
किन्ही, ता. भुसावळ : यंदा महाराष्ट्र राज्यावर ओढावलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरीब कुटुंबांना दिवाळीच्या सणात दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ

 

एकनाथरावजी शिंदे यांच्या पुढाकारातून भुसावळ तालुक्यातील किन्ही येथे गरजू नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. दिवाळीच्या सणापूर्वी गरजू कुटुंबांच्या घरापर्यंत मदतीचा हात पोहोचल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण

 

परिस्थितीत दिवाळीसारखा आनंदाचा सण साजरा करताना गोरगरीब कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरविल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या या मदतीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना सणासुदीच्या काळात मोठा आधार मिळाला आहे. केवळ आश्वासन न देता गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या शिधा वाटप कार्यक्रमाला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधानभाऊ महाजन, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्रभाऊ चौधरी, शिवसेना महिला जिल्हा

 

आघाडीप्रमुख नंदाताई निकम, माजी युवासेना जिल्हाप्रमुख पवन भोळे, समाजसेवक प्रकाशभाऊ निकम यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी, महिला भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतमजूर, कष्टकरी आणि गोरगरीब नागरिकांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या निमित्ताने आनंद निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सण-उत्सवांचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, या भावनेतून करण्यात आलेल्या या शिधा वाटपामुळे किन्ही परिसरातील लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या