Friday, November 20, 2026
Homeजळगावमहात्मा गांधी विद्यालयात इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

महात्मा गांधी विद्यालयात इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

महात्मा गांधी विद्यालयात इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन
राष्ट्रीय एकात्मता दिनही उत्साहात साजरा

वरणगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

येथील महात्मा गांधी विद्यालयात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान तथा माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य सी. जे. तायडे, उपमुख्याध्यापक डी. आर. कोळंबे यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक महेंद्र भंगाळे यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याची माहिती देताना देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, त्यांचे नेतृत्व आणि देशहितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा आढावा घेतला. तसेच इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणूनही साजरी केली जात असल्याचे सांगून राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपण्याचे महत्त्व विशद करत शपथ घेण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सी. जे. तायडे, उपमुख्याध्यापक डी. आर. कोळंबे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य सी. जे. तायडे, उपमुख्याध्यापक डी. आर. कोळंबे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या