Friday, November 20, 2026
Homeजळगाववरणगाव पोलिस स्टेशनतर्फे शिवबा मित्र मंडळाला द्वितीय क्रमांक देऊन गौरव

वरणगाव पोलिस स्टेशनतर्फे शिवबा मित्र मंडळाला द्वितीय क्रमांक देऊन गौरव

वरणगाव पोलिस स्टेशनतर्फे शिवबा मित्र मंडळाला द्वितीय क्रमांक देऊन गौरव

-बक्षीसची परंपरा कायम राखली; दरवर्षी विविध सजीव देखाव्याचे वेधतात लक्ष

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                वरणगाव ता भुसावळ
पोलिस स्टेशन वरणगाव यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्र दुर्गा उत्सव २०२६ च्या विसर्जन मिरवणुकीत समाज प्रबोधनाच्या सूचनांचे पालन करीत दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल शिवबा मित्र मंडळ मोठा माळी वाडा या मंडळला द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या गौरवामध्ये शिवबा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लहान-मोठे, ज्येष्ठ, श्रेष्ठ, मार्गदर्शक सदस्य यांची मेहनत, जिद्द, सहकार्य यांच्यामुळेच हे शक्य होते. अशी प्रतिक्रिया शिवबा मंडळाचे अध्यक्ष संतोष माळी यांनी दिली.

वरणगाव पोलिस स्टेशन यांच्यातर्फे शिवबा मित्र मंडळ यांना समाज प्रबोधन यांच्यावर शक्ती आणि भक्ती यांचा संगम छत्रपती शिवाजी महाराज आणि जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सजीव देखावा सादर केला होता. त्याबद्दल पोलिस स्टेशन यांच्याकडून द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याहस्ते शिवबा मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष माळी, उपाध्यक्ष भूषण माळी, किरण माळी, पांडू माळी, बापू माळी, संकेत माळी, विशाल माळी,रितेश माळी, यश माळी, उमेश माळी, निखिल माळी, विवेक माळी, भूषण माळी, पवन माळी, प्रवीण माळी, आशिष माळी, वैभव माळी, सौरभ माळी, अभिषेक माळी यांच्यासह मंडळाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या