काही शेतकऱ्यांना अद्यापही सरकारी मदत अनुदान मिळाले नसल्याचे तहसीलदार यांना निवेदन मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह प्रतिनिधी गेल्या तीन महिन्यापासून शासन दरबारी कर्जमुक्ती अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खाते रक्कम जमा झालेले नाहीत
त्याचप्रमाणे दिवाळी च्या अगोदर पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात अजून शेतकऱ्यांच्यां खात्यात तालुक्यात हजार रुपये आलेले नाही
महसूल विभागातून तहसीलदार यांनी शासन दरबारी निवेदनाची दखल घेऊन महसूल मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे अंमलबजासाठी पाठवावे व शेतकऱ्यांना त्वरित मुक्ताईनगर सह तालुक्यात ग्रामीण शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खाते रक्कम जमा करण्यात यावी व दिवाळी भेट 5000 सुद्धा देण्यात यावे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शेतकरी बंधूंच्या वतीने निवेदन देण्यात आले
उपस्थित मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई शहराध्यक्ष मंगेश कोळी,मनसे उपाध्यक्ष सुनील कोळी मीराबाई पाटील, रुईखेडा मुक्ताईनगर ,सुरेश तायडे मुक्ताईनगर, निवृत्ती कडू पाटील, मुक्ताईनगर, वासुदेव चौधरी, राहुल पाटील, शेमळदे सर्व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती संदर्भातील शेतकरी गाव वढवे, चांगदेव, मानेगाव, मुक्ताईनगर, उचंदे, पंचाणे ,पिंपरी नांदूर, बेलसवाडी,अंतुर्ली, धामंदे , कुऱ्हा, राजुरा, वडगाव, रुईखेडा, भानगुरा, तरोडा, आदी गावांच्या शेतकऱ्यांना कर्ज संदर्भामध्ये खात्यात पैसे आले नाही किंवा दिवाळी भेट 5000 सुद्धा मिळालेले नाही.


