सरकारी खात्यांत मागासवर्गीयांच्या अडीच लाख जागा अद्यापही रिक्त.

पदोन्नती व जुनी पेन्शन साठी मुंबईत २५ पासून आंदोलन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
विविध सरकारी खात्यांत मागासवर्गीयांच्या अडीच लाख जागा रिक्त आहेत. त्या भरण्यात याव्यात, आणि जुनी पेन्शन लागू करण्यात यावा व विविध प्रकारच्या या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना यांच्या वतीने बुधवारी (दि. २५) मुंबईत आझाद मैदानावर राज्यस्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी भुसावळ येथे पत्रकार परिषदेत दिली आहे .
पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि राज्यभरातील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांनी आणि इतर शासकीय कर्मचारी यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आधिच महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी केले आहे. राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होणार आहे.
सन २०१७ पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी महासंघाने शासनाकडे वारंवार निवेदने देऊन, बैठका घेऊन आणि विविध आंदोलने करून पाठपुरावा केला. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे पात्र अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत.
केंद्र शासनाने १५ जून २०१८ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनानेही निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.मडावी म्हणाले, नियमित नोकरभरती राबवावी, कंत्राटी भरतीच्या धोरणाचा पुनर्विचार करावा आणि आरक्षित पदे नियमानुसार भरावीत, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत.
कर्मचाऱ्यांनी २५ नोव्हेंबरला आझाद मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन आदींनी केले आहे.
पदोन्नतीमध्ये अडथळे व जुनी पेन्शन लागू करण्यात यावा.
विविध संवर्गातील वेतन त्रुटी दूर करणे, पदोन्नतीतील अडथळे दूर करणे, वाहनचालक व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करणे तसेच दिव्यांग शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.
यात प्रामुख्याने जळगाव , नाशिक, धुळे, नंदुरबार तसेच रविंद्र तायडे नाशिक विभागीय अध्यक्ष, पुलकेशी केदार जिल्हाध्यक्ष, विज्ञान सोनवणे जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटनायोगेश अडकमोल जिल्हा कार्याध्यक्ष, प्रा. प्रमोद लोंढे जिल्हा सरचिटणीस, सचिन सपकाळे जिल्हाध्यक्ष जलसंपदा, महेश सपकाळे जिल्हाध्यक्ष महसूल, सुरेश भालेराव जिल्हाध्यक्ष म.न.पा., सुरेश वाडे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख, विकास सोनवणे वनविभाग, रविंद्र गायकवाड कोषागार विभागाचे आदी संख्येने उपस्थित होते .

