Thursday, November 26, 2026
Homeजळगावफैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

फैजपूर :    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        येथील म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत मूल्ये आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून संविधानातील मूल्यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.

कार्यक्रमात विद्यालयाचे माजी उपशिक्षक श्री. बी. डी. महाले सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व आणि संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्ये यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच श्री. एन. पी. पाटील सर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून उपस्थितांना संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची जाणीव करून दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. व्ही. एम. भोई सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्रीमती ललिता पाटील मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के.टी.तळेले, पर्यवेक्षक श्री. एस. ओ. सराफ, शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संविधान दिनाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या