Thursday, November 26, 2026
Homeजळगाववराडसीम - बेलव्हाळ रस्त्याचे ' आता वाजले की तेरा ' म्हणण्याची वेळ...

वराडसीम – बेलव्हाळ रस्त्याचे ‘ आता वाजले की तेरा ‘ म्हणण्याची वेळ ?

वराडसीम – बेलव्हाळ रस्त्याचे ‘ आता वाजले की तेरा ‘ म्हणण्याची वेळ ?

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      सुनसगाव ता भुसावळ  – येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ मार्गे वराडसीम रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे तसेच खड्डे पडले असून खडी वर आल्याने ‘ आता वाजले की तेरा ‘ म्हणण्याची वेळ या रस्त्यावर ये जा करणाऱ्या शेतकरी तसेच नागरिकांना म्हणण्याची वेळ आली आहे.
सध्या सर्वत्र रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहेत कुऱ्हा पानाचे व इतर गावांमध्ये तर रस्ते दुरुस्ती साठी रस्ता रोको आंदोलन केले जात आहे. आता काही दिवसांपूर्वी सुनसगाव – बेलव्हाळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी बेलव्हाळ पदाधिकारी व ग्रामस्थांनी ना.संजय सावकारे यांना निवेदन दिले होते त्यामुळे ना.संजय सावकारे यांनी सुनसगाव – बेलव्हाळ रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आदेश दिले आणि डांबरीकरण करण्यात आले आता वराडसीम – बेलव्हाळ रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे या रस्त्यावरून शेतकरी , मजूर नेहमी ये जा करीत असतात एखादे वाहन आले तर बैलगाडी बाजूला कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो त्यामुळे या रस्त्याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित अधिकारी यांनी काटेरी झुडपे तसेच रस्ता डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या