भुसावळ रेल्वे स्टेशन जवळील परिसरात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने भारतीय संविधान दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने रेल्वे स्टेशनजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पदाधिकाऱ्यांनी भारतीय संविधानाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि त्यासोबतची नागरिकांची कर्तव्ये यावर सविस्तर विचार मांडण्यात आले. जळगाव महिला जिल्हाध्यक्षा सारिकाताई राजपूत यांनीही संविधानाचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधानाची मूल्ये, लोकशाहीची तत्त्वे आणि सामाजिक ऐक्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. आपल्या देश संविधानाच्या आधारे चालत असुन प्रत्येक नागरीकांचे स्वातंत्र त्यामुळे अबादीत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले .
या प्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत, जळगाव महिला जिल्हाध्यक्षा सारिकाताई राजपूत, महाराष्ट्र प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हा अध्यक्ष संदीप राणा,प्रदीप पाटील,कनक पाटील, नितीन पाटील चोरवड, जयश्री ताई पाटील,कोकिळाताई पाटील, अर्चनाताई राजपूत, यांच्या प्रिया राजपूत, प्रतीक्षा पाटील, दिवाणसिंह राजपूत, सुरेश पाटील,यांच्यासह करणी सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


