Friday, November 27, 2026
Homeजळगाव‘कोण बनेगा करोडपती’ विजेत्या वृषाली मेढे यांचा वरणगाव पोलिसांतर्फे सन्मान

‘कोण बनेगा करोडपती’ विजेत्या वृषाली मेढे यांचा वरणगाव पोलिसांतर्फे सन्मान

‘कोण बनेगा करोडपती’ विजेत्या वृषाली मेढे यांचा वरणगाव पोलिसांतर्फे सन्मान

उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ देऊन गौरव

वरणगाव     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   : ‘कोण बनेगा करोडपती’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमात विजेतेपद मिळविणाऱ्या वरणगाव येथील सौ. वृषाली अतुल मेढे (मगरे) यांचा वरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल आणि पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेनकोळी यांच्या हस्ते वृषाली मेढे यांना पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
सामान्य कुटुंबातील व्यक्तीने आपल्या ज्ञानाच्या, जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर लोकप्रिय कार्यक्रमात यश संपादन करणे ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे वरणगाव शहराच्या नावलौकिकात भर पडली असून, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या