Saturday, May 2, 2026
Homeगुन्हाशहरात मध्यरात्री रिक्षाचालकाच्या घरावर गोळीबार ; तिघांना अटक!

शहरात मध्यरात्री रिक्षाचालकाच्या घरावर गोळीबार ; तिघांना अटक!

शहरात मध्यरात्री रिक्षाचालकाच्या घरावर गोळीबार ; तिघांना अटक!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरीत मध्यरात्री दीड वाजता राम विश्वास बोरसे (वय २६) या रिक्षा चालकाच्या घरावर २५ रोजी मध्यरात्री दीड वाजता तीन जणांनी गोळीबार केल्याची घटना घडली. दिनेश भारत चौधरी, सागर जाधव व नागपुरे या तिघांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, राम बोरसे हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. २५ रोजी रात्री वडील विश्वास बोरसे, बहीण व भाचे असे घरात झोपलेले असताना दीड वाजेच्या सुमारास दिनेश चौधरी व त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांनी घराच्या पोर्चमध्ये येऊन लोखंडी दरवाजावर गोळीबार केला. या आवाजाने विश्वास बोरसे उठले असता, तिघांनी भिंतीवरून उड्या घेऊन पलायन केले. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या