Saturday, May 30, 2026
Homeगुन्हारिक्षा व मालवाहूची समोरासमोर धडक : भुसावळात क्लाससाठी येणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचा...

रिक्षा व मालवाहूची समोरासमोर धडक : भुसावळात क्लाससाठी येणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू !

रिक्षा व मालवाहूची समोरासमोर धडक : भुसावळात क्लाससाठी येणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू !

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सावदा येथून भुसावळ येथे खाजगी क्लास साठी जाणाऱ्या प्रवाशी रिक्षा तून जात असताना आमोदा जवळ मालवाहतूक समोर समोर धडक होऊन यात आदिती सोपान खडसे (वय १३) या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला तर प्रवासी रिक्षातील ओजल संदीप पाटील (वय १३), सार्थ शंतनु सरोदे (वय १३), प्रवासी रिक्षा चालक प्रभाकर ओतारी सह अन्य दोन जण सर्व रा सावदा ता रावेर येथील रहिवासी जखमी झाले आहे ही घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सावदा येथून एम एच १९ सीडब्लू ३५९० ही प्रवासी रिक्षा प्रवासी घेवून भुसावळ येथे जात होती. आमोदा गावा नजिक समोर येणाऱ्या लाल रंगाच्या माल वाहतूक रिक्षा क्रमांक एमएच १९ एस ७०६४ या रिक्षाने समोरून जोरदार धडक दिल्याने यात सावदा येथील डॉ सोपान खडसे यांची मुलगी आदिती सोपान खडसे (वय १३) हीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारणीभूत असलेल्या माल वाहतूक करणाऱ्या चालका विरुद्ध डॉ शंतनु सरोदे यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मृत्यू झालेल्या आदिती खडसे याचे यावल येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा सावदा येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास स पो नी रामेश्वर मोताळे याच्या मार्गदर्शाखाली पी एस आय नीरज बोकील करत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या