Thursday, June 12, 2025
Homeगुन्हाशेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक!

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक!

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक!

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आडगाव शिवारातील एका शेतात सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास स्त्री जातीचे मृत अर्भक मिळून आल्याची घटना घडली आहे. पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या आडगाव शिवारातील कैलास रामकृष्ण पाटील यांच्या शेतात ७रोजी सकाळी १०:३० वाजता स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याची माहिती पोलिस पाटील संगीता गोविंद पाटील यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोउनि योगेश्वर हिरे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या