तलवार व कोयता कब्जात बाळगुन दहशत माजविना-या इसमास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव च्या पथकाने केले जेरबंद
बोदवड खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगांव जिल्हात मिश्र वस्तीच्या ठिकाणी व इतर ठिकाणी वावरत असतांनाअ सन उत्सवाच्या काळात काही समाज कंटकाकडुन शस्त्र संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते .
या अनुषंगाने मा.डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगांव मा. अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक, जळगांव, याचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे, अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन पर सुचना देण्यात आलेल्या आहेत.
दिनांक ९ जुन रोजी पो.ना/श्रीकृष्ण देशमुख यांना गोपणीय, बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम बोदवड ते शेलवड व महालक्ष्मी माता मंदीर, तपोवन कडे जाणा-या रोडाने बोदवड ता-बोदवड जिल्हा-जळगांव येथे हातात तलवार व कोयता घेवुन दहशत माजवित आहे. अशी माहीती मिळाली. मिळालेल्या माहीतीच्या अनुषगांने सदरची माहीती पो.ना / श्रीकृष्ण देशमुख यांनी वरीष्ठ पो.नि श्री संदीप पाटील यांना बातमी कळविली असता वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.निरी शरद बागल, पोहेकॉ/प्रितम पाटील, पो. अं/ रविंद्र चौधरी यांचे पथक तयार करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बोदवड हद्दीत बोदवड ते शेलवड व महालक्ष्मी माता मंदीर, तपोवन कडे जाणा-या रोडने पथकातील अधिकारी व कर्मचारी असे जावुन पाहता इसम नामे पुरुषोत्तम श्रावण वंजारी वय-26 रा-माळी वाडा, बोदवड ता-बोदवड हा त्याचे कब्जात तलवार व कोयता बाळगुन दहशत माजवीत असतांना मिळुन आला असून त्याचे ताब्यात एकुण 4500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द बोदवड पो.स्टे ला गु.र.न 106/2025 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम 4/25 मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.