Thursday, June 12, 2025
Homeजळगावभुसावळ शहराच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोगाची आढावा बैठक

भुसावळ शहराच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोगाची आढावा बैठक

भुसावळ शहराच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोगाची आढावा बैठक

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            भुसावळ, दि. ११ जून २०२५
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबईचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम व सदस्य सौ. वैदेही वाढाण यांनी आज भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. शिवसेना (शिंदे गट) रावेर लोकसभा महिला जिल्हा प्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली.

या बैठकीत शहरातील स्वच्छता, पाणीटंचाई, वीजपुरवठा, मोठ्या नाल्यांची स्वच्छता, धूळ नियंत्रण फवारणी, तसेच आरोग्यविषयक गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विशेषतः भुसावळ शहरात पोस्टमार्टम सुविधेचा अभाव असून नागरिकांना वरणगाव किंवा जळगावला जावे लागते, यावर आयोगाच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांना गणवेश वाटपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्याकडून विविध विषयांवर माहिती घेण्यात आली व सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना दिनांक १८ जून २०२५ रोजी मुंबई येथे आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहरातील विविध समस्या वर उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकारी यांना दिले आहे .

या बैठकीस नगरपालिका रुग्णालयाच्या मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. सौ. कीर्ती फलटणकर, शिवसेना महिला पदाधिकारी स्वाती माळी, मनीषा पाटील, दिपाली बऱ्हाटे, वर्षा तल्लारे, स्वाती भंगाळे, वैशाली पाटील, पूजा पाटील, संगीता भंगाळे, संध्या तायडे, पूजा तायडे तसेच शिवसैनिक पवन नाले, दुर्गेश बेदरकर, विलास मुळे, अखलाक शेख आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बैठक शहरातील समस्यांबाबत प्रशासनाच्या भूमिकेची जबाबदारी निश्चित करणारी ठरली असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत लवकरात लवकर उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या