Saturday, June 14, 2025
Homeगुन्हाहॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास ; पाच जणांविरुद्ध गुन्हा...

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल रोडवरील हॉटेल तृभावी मालकाला मारहाण करून खंडणी मागत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन लंपास केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध दि.१२ मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,यावल रोडवर हॉटेल तृभावीचे मालक किशोर पूनमचंद आईदासानी (वय ४६) यांना दि. १० रोजी दुपारी ४ ते वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी शेख आरीफ शेख कलीम, गोपी साळी, मुजाहिद उर्फ मज्जू डॉन, शाहरुख शेख कलीम व त्याच्यासोबतचा राहणारा पप्पू सर्व (रा. फैजपूर) यांनी बिलाचे पैसे न देता मारहाण केली आणि प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खंडणी मागितली. गळ्यातील १ लाख ८० रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची चैन तोडून नेली. या घटनेप्रकरणी किशोर आईदासानी यांनी तक्रार दिल्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपअधीक्षक कृष्णकांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या