जनसुरक्षा कायदा अत्यंत घातक. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी (वा) जन सुरक्षा कायदा आणल्यास सामाजिक तथा कामगार क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यास प्रचंड अडचणी निर्माण होऊन व्यवस्थापन व सरकारमधील अधिकाऱ्यांची मुजोरी वाढणार असल्याने सरकारने मान्य केलेला जनसुरक्षा कायदा हा त्वरित रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भुसावळच्या वतीने प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
ज्यांना सुरक्षा कायद्यामधील तरतुदी अत्यंत घातक असून समाज तथा कामगार क्षेत्रात कार्यकर्ते संघटना युनियन यांचे प्रश्न व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांकडून निकाली काढून घेताना अत्यंत अडचणी येणार असून त्याचा फायदा प्रशासनातील मुजोर अधिकाऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे भ्रष्टाचार वाढण्यास वाव मिळणार आहे यासाठी अगोदरच अनेक कायदे उपलब्ध असल्याने सदर कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भुसावळच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे सामाजिक क्षेत्रात परिवर्तनवादी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही प्रवृत्ती वेगवेगळ्या पद्धतीने देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे या प्रकरणांमध्ये परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून अशा बदनाम करणाऱ्यांना आपण आवर घालून परिवर्तनवादी चळवळींना सहकार्य करावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव अरुण दामोदर, कार्याध्यक्ष शांताराम जाधव, उपाध्यक्ष सुभाष लोखंडे, अंजना निर्भवणे, जे एम वराडे , पत्रकार राजेश तायडे, सिद्धार्थ सोनवणे ,राहुल घोडेस्वार, नरेश वाघ ,नरहरी वासनिक, रमेश गणवीर, मेजर गोतमारे , पत्रकार सुनील आराक , पत्रकार प्रेम परदेशी, विजय साळवे, भिमज्योत शेजवळ, नरेंद्र म्हस्के, भरत पाटील आदी उपस्थित होते.