Wednesday, April 29, 2026
Homeआरोग्यभुसावळात पत्रकारांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळात पत्रकारांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळात पत्रकारांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोल्डन अवर हॉस्पीटलतर्फे आयोजन ः पत्रकारांनी आरोग्य जपावे
डॉ.सांतनू कुमार साहू

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांनी समाजासाठी अहोरात्र काम करताना आपले आरोग्य निरोगी ठेवणेही गरजेचे आहे. कामाचा व्याप व धावपळीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकदा विविध आजारांच्या व्याधी जडतात त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करून आहाराचे पथ्य पाळत पायी चालावे, असे आवाहन भुसावळातील गोल्डन अवरचे संचालक डॉ.सांतनू कुमार साहू यांनी केले. भुसावळ शहरातील सर्व माध्यमातील पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

25 पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी
भुसावळातील आनंद नगरस्थित गोल्डन अवर हॉस्पिटलमध्ये शनिवार, 12 जुलै रोजी सकाळी 10 ते दोन या वेळेत सुमारे 25 पत्रकार, छायाचित्रकारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यावेळी रक्तदाब (बीपी), शुगर (डायबीटीस) तपासणी करून ईसीजी काढण्यात आला तसेच पत्रकारांचे यावेळी डॉक्टरांनी समूपदेशन करीत आहाराबाबत टीप्सही दिल्या व औषधीही सूचवल्या.

पत्रकारांचा सहृदय सन्मान
गोल्डन अवर हॉस्पीटलतर्फे यावेळी शहरातील सर्वच माध्यमातील मान्यवर पत्रकार बांधवांचा डॉ.सांतनू कुमार साहू, हॉस्पीटलच्या संचालिका ईतीश्री साहू यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी एच.आर.विभागाचे प्रमुख गिरीश कोळी, फार्मसी इन्चार्ज जितेश ढाके व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, डॉ.साहू यांचा विश्व पटलावर झालेल्या सन्मानाची दखल घेत भुसावळ पत्रकार संघातर्फे डॉक्टरांचा संघाचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण, उपाध्यक्ष गणेश वाघ, प्रेम परदेशी यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

हॉस्पीटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचा किरण
डॉ.साहू यांनी यावेळी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली तसेच गेल्या दोन वर्षांच्या काळात 13 हजाराहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याचे व चार हजारांहून अधिक शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या कॅशलेस सुविधांचीही त्यांनी माहिती दिली.

पत्रकार परिषदेला संजयसिंग चव्हाण, नरेंद्र पाटील, मनोहर लोणे, कलीम पायलट, विनोद गोरधे, आकाश ढाके, गोपाल म्यांद्रे, सुरेश महाले, उत्तम काळे, कमलेश चौधरी, विनोद सुरवाडे, ईकबाल खान, इम्तियाज अहमद, सुनील आराक, जोहेब सैय्यद, मझहर शेख, अझहर शेख, हबीब चव्हाण, उज्ज्वला बागुल, श्याम गोविंदा, सतीश कांबळे आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन व आभार गोल्डन अवर हॉस्पीटलचे पीआरएम गणेश वाघ यांनी केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हॉस्पीटलच्या सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या