बेकायदा गौण खनिज वाहतूक लाखो रुपयाची रॉयल्टी बुडविल्याची तक्रार.

७ ते ८ हजार ब्रास मातीची अवैध वाहतूक.
भुसावळ दि.१४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी रावेर तालुक्यातील मौजे तासखेडा शिवारात हतनुर धरण कालवा किलोमीटर क्र.६ तासखेडा थोरगावहून रस्त्याला क्रॉस झालेल्या हतनुर कालवा पुलाजवळील कालव्याच्या डाव्या बाजूच्या भरावाची अंदाजे ७ ते ८ हजार ब्रास माती वाहतूक करून शासनाची लाखो रुपयाची रॉयल्टी बुडविल्याची तक्रार जिजाबराव चौधरी यांनी केली आहे.परंतु महसूल विभागाने अद्याप कारवाई न केल्याने तक्रारदार यांनी आत्मदहनाचा इशारा दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जागृत जनमंच जळगाव येथील सदस्य असलेले तथा तासखेडा येथील तक्रारदार जिजाबराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी जळगाव व उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर यांच्याकडे २ जुलै २०२५ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की याआधीच्या तक्रार अर्जांचे स्मरण करून देण्यात येते की,रावेर तालुक्यातील मौजे तासखेडा शिवारात हतनूर धरण कालवा कि.मी.क्र. ६ तासखेडा-थोरगव्हाण रस्त्याला क्रॉस झालेल्या कालवा पुलाजवळ तसेच तासखेडा शिवारातील गट क्रमांक २७५ व २७६ या शेतजमिनीस लागून हतनूर कालव्याच्या डाव्या बाजूच्या भरावातील माती ही तासखेडा गावचा नागरीक शुभम विकास चौधरी हा जेसीबी आणि ट्रॅक्टरांच्या
सहाय्याने जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून रॉयल्टी न भरता बेकायदेशीरपणे

माती उचलून विक्री करीत असून, आज पावेतो त्याने अदमासे ७ ते ८ हजार ब्रास मातीची विक्री केलेली आहे.परिणामी गौण खनिजची रॉयल्टी वसुली होत नसल्याने शासनाचा लक्षावधी रूपयांचा महसूल बुडत आहे.या पत्राद्वारे आपणास कळकळीची विनंती करतो की,शुभम चौधरी याने विना
रॉयल्टी विक्री केलेल्या माती खदान जागेची पाहणी करण्यात यावी, व मी तक्रारदार असल्याने माझ्या समक्ष त्रयस्थ तांत्रिक मोजणीदारांकडून अनधिकृतपणे उचल झालेल्या मातीच्या
परीमाणाची ब्रास मध्ये मोजणी करून पंचनामा करण्यात यावा, व त्याच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही
करून,त्याचे कडून सध्याच्या रॉयल्टी रेट नुसार दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी,ही विनंती.
आपणास या पत्राद्वारे सविनय सुचीत करण्यात येते की, दोषींवर दंडात्मक कार्यवाही लवकरात लवकर न केल्यास मी आपल्या कार्यालयाच्या आवारात आत्मदहन
करेल.लेखी निवेदनाद्वारे तासखेडा येथील तक्रारदार जिजाऊराव पाटील यांनी इशारा दिला आहे तरी जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण रावेर- यावल तालुक्याचे लक्ष लागून आहे.

