Saturday, May 2, 2026
Homeजळगावफैजपुर नगरीत भागवत कथारुपी महाकुंभ यशस्वीपणे आयोजित - परमपूज्य श्री रामकिशोरदासजी महाराज...

फैजपुर नगरीत भागवत कथारुपी महाकुंभ यशस्वीपणे आयोजित – परमपूज्य श्री रामकिशोरदासजी महाराज शास्त्री

फैजपुर नगरीत भागवत कथारुपी महाकुंभ यशस्वीपणे आयोजित – परमपूज्य श्री रामकिशोरदासजी महाराज शास्त्री

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

फैजपूर स्थित सुप्रसिद्ध श्री खंडोबा वाडी देवस्थानात साकेतवासी महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या सातव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथेच्या निमित्त महाकुंभाचे पहिले स्नान संतदर्शन व अभिर्वचनाच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पाडले असे गौरवोद्गार परमपूज्य श्री श्री रामकिशोरदासजी महाराज शास्त्री, अध्यक्ष, दिगंबर आखाडा, नाशिक यांनी व्यक्त केले.

ते फैजपूर येथील श्री खंडोबा वाडी देवस्थानाच्या वतीने आयोजित श्री गुरुपौर्णिमा उत्सव व ब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्यानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेच्या संत अभिर्वचन सत्राचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर परमपूज्य आंतरराष्ट्रीय धर्माचार्य देवमोरारीबापू, परमपूज्य महंत श्री विष्णुदासजी महाराज, सप्तशृंगी गड, नाशिक, परमपूज्य महंत श्री दिव्यचैतन्य जी महाराज वृंदावन धाम पाल, महंत श्रीकृष्णगिरीजी महाराज सोमवार मढी सावदा, आचार्य श्री मानेकरबाबा शास्त्री सावदा, प पू राजधरबाबा पूजदेकर श्रीकृष्ण मंदिर महानुभाव संस्थान फैजपूर, महंत श्री स्वरूपानंद जी महाराज श्रीक्षेत्र डोंगरदे, शास्त्री श्री अनंतप्रकाशदासजी सावदा, शास्त्री नयनप्रकाशदासजी जळगाव, महंत श्री कन्हैयादासजी महाराज, प पु श्री गेंदानाथजी महाराज भुसावळ, श्री कन्हैया प्रभू इस्कॉन मंदिर फैजपूर, श्री विठ्ठल महाराज शेंदुर्णी, प पु श्री परम तपस्वी हरिदासजी महाराज कन्नड, हभप श्री दुर्गादास महाराज खिर्डी, परमपूज्य महंत श्री संतोषदास महाराज कुसुंबा भवानी, परमपूज्य श्री रामेश्वर महाराज बामनोद,
महामंडलेश्वर महंत पुरुषोत्तम दासजी महाराज, प्रांताधिकारी श्री बबनराव काकडे, नायब तहसीलदार महोदय यांच्यासहित पंचक्रोशीतील व विविध आश्रमातील साधू, संत, महंत, मान्यवर भक्तगण यांची उपस्थिती होती.

आधी काल्याचे किर्तन ह भ प श्री भरत महाराज म्हैसवाडीकर यांच्या श्रीमुखातून श्रोत्यांनी श्रवण केली. त्यानंतर ब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संत आशीर्वाद सभेचे अध्यक्ष प पु श्री श्री रामकिशोर दासजी महाराज शास्त्री, अध्यक्ष, दिगंबर आखाडा नाशिक, यांनी साधुसंत हे कमल पुष्पा सारखे असून ते कधीही घाण होत नाहीत तर ते ज्या ही जागी जातात ही जागा स्वच्छ, पवित्र, पावन करून जगाच्या कल्याणाचे काम करतात. ‘जाकी रही भावना जैसी’ या उक्ती नुसार ज्याचे कर्म चांगले त्याला फळही चांगलेच मिळते असे सांगून प्रयागराज येथे श्री खंडोबा वाडी देवस्थानचे उत्तराधिकारी पवनकुमार दासजी यांना महामंडलेश्वर उपाधी सर्वसाधुसंतांच्या आशीर्वादाने प्राप्त झाली असून फैजपूर नगरीचे हे अहोभाग्य असल्याचे नमूद केले व नाशिक येथे होणाऱ्या २०२७ च्या महाकुंभा आधीच फैजपूर येथे महंत घनश्याम दासजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाकुंभ प्रथम स्थान संपन्न झाले असे गौरवोद्गार काढले.

यावेळी प पू महंत श्री विष्णू दासजी महाराज, आंतरराष्ट्रीय धर्माचार्य देवमोरारी बापू, प. पू आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री, महंत श्री स्वरूपानंदजी महाराज, शास्त्री नयनप्रकाश दासजी महाराज, प पू महंत श्री संतोषदास महाराज, प पू महंत श्री दिव्यचैतन्यजी महाराज, आदी संत महंतांनी उपस्थित भक्तगणांना शुभाशीर्वाद, संत वचन व आनंदी जीवन जगतानाच मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळवण्याचे गमक साध्या, सरळ, सोप्या शब्दात मांडले.

सात दिवसीय संगीतमय श्रीमद् भागवत कथा वक्ता श्री हभप श्री भरत महाराज म्हैसवाडीकर यांच्या सुश्राव्य मधुर वाणीतून श्रोत्यांनी ग्रहण करून जीवनाचा आनंदोत्सव साजरा केला. या कथेचे मुख्य यजमान श्री सिताराम दगडू नारखेडे, चिनावल हे होते तर सात दिवशी यजमान श्री दोधू अमृत बोरोले, डॉ. लोकेश सुरेश नेहते, प्रा. अशोक हेमा पाटील, श्री अमोल अशोक महाजन, श्री नरेंद्र पितांबर चौधरी, श्री हर्षल संजय काचकुटे, श्री चंद्रकांत बळवंत पाटील हे होते.

या कथेच्या यशस्वीतेसाठी केयूर टेन्ट हाऊस फैजपूर, सिताराम बाबा आश्रम मित्र मंडळ भुसावळ, जय अंबिका लाइटिंग फैजपूर, जय मल्हार मित्र गणेश मंडळ फैजपूर व पंचक्रोशीतील भक्त मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

कथेच्या आयोजनामुळे जीवन किती सुंदर व आनंदी असू शकते याचा भावार्थ करून पुरुषाचा पुरुषोत्तमाकडे जाणारा मार्ग मिळाल्याचे समाधान उपस्थित भक्तगणांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी तर आभार महामंडलेश्वर पवनकुमारदासजी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री खंडोबा वाडी देवस्थानातील गादीपती महामंडलेश्वर महंत पुरुषोत्तम दासजी महाराज, पुजारी श्रीराम मनोहर दासजी, उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवनकुमार दासजी यांच्या आशीर्वादाने समस्त श्री खंडोबा वाडी देवस्थान भक्त मंडळी व पंचक्रोशीतील भक्त गणांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या