Saturday, May 2, 2026
Homeजळगावआत्मविश्वास हेच युवतींचं खरं बळ - मनीष जैन

आत्मविश्वास हेच युवतींचं खरं बळ – मनीष जैन

आत्मविश्वास हेच युवतींचं खरं बळ – मनीष जैन

> अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सजग युवती सक्षम युवती उपक्रम

रावेर   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

आत्मविश्वास हेच युवतींचं खरं बळ आहे.ज्यांचा आत्मविश्वास दृढ असतो अशा निर्णयक्षम स्त्रिया म्हणजेच भविष्यातील जिजाऊ,सावित्रीमाई आणि रमाबाई ठरतील असा विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य आमदार मनीषदादा जैन यांनी व्यक्त केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसने रावेर लोकसभा मतदारसंघात चालविलेल्या जनविश्वास सप्ताहाअंतर्गत येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘सजग युवती,सक्षम युवती’ या समाजाभिमुख उपक्रमाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष व उपक्रमाच्या संयोजिका कु. भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

आजच्या काळात युवतींसमोर विविध आव्हाने उभी आहेत.सायबर गुन्हे, सामाजिक दबाव,आत्मनिर्भरतेचा अभाव आदी प्रश्नांवर मात करता यावी म्हणून ‘सजग युवती-सक्षम युवती’ हा उपक्रम राबवण्यात येत असून पर्यावरणाशी नाते जपण्यासाठी वटवृक्ष सुद्धा लावण्यात येत असल्याचे सांगून यापुढे शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमकपणे बाजू मांडणार असल्याची भूमिका नमूद केली.पक्षाच्या युवती संघटक सिमरन वानखेडे,रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल,माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे,माजी युवक अध्यक्ष शितल साळी,इरफान शाह इस्माईल शाह यांची विशेष उपस्थिती होती.अमित मोहिते यांनी ‘सोशल मीडिया हाताळताना युवतींनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, अनोळखी लिंक व मेसेजपासून सावधगिरी आणि ओटीपी अथवा बँक डिटेल्स शेअर करण्याचे तोटे स्पष्ट केले.पुसद जि. यवतमाळ येथील दुसऱ्या व्याख्यात्या रुखसाना परवीन यांनी ‘अल्पसंख्याक समाजातील युवती व महिलांच्या प्रगतीत समाजाची भूमिका’ या विषयावर बोलताना सांगितले की,अल्पसंख्याक स्त्रियांनी पारंपरिक चौकटी ओलांडून समाजातील पुढाकार घ्यावा, हे काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी अनेक उदाहरणांद्वारे उपस्थित अल्पसंख्यांक युवतींमध्ये प्रेरणा निर्माण केली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी सोशल मीडियाच्या योग्य वापरावर भर देत,विद्यार्थिनींना सतर्क आणि सजग राहण्यासंबधी टिप्स दिल्या.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी १० विद्यार्थिनींना वडाच्या झाडाची रोप भेट देण्यात आली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.नियती घेमड,वृशाली चौधरी,दीपाली महाजन,अर्शिया तडवी,दर्शना जोशी,रोशनी तडवी, इच्छाश्री महाजन,विश्वा पाटील,हर्षिता महाजन व गुंजन महाजन या दहा युवतींनी वटवृक्ष घेत आपल्या घरी किंवा शेतामध्ये झाडाचे संगोपन करून जगवण्याचा संकल्प केला. दरवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस साजरा होत असताना या वटवृक्षाचा सुद्धा वाढदिवस साजरा केला जाईल असा निश्चय व संकल्प या युवतींनी केला.

कार्यक्रमास स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलाचे संस्थापक रवींद्र पवार यांचे अमूल्य सहकार्य लाभले.मुख्याध्यापक राजू देवसिंग पवार व पर्यवेक्षक कीर्ती राजेश कानगो यांनी व्यवस्थापन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिनेश थोरात यांनी मानले.अंकिता वाणी,अनुष्का कोळी, भूमिका सपकाळे,तेजश्री धनगर व स्वामींनी पाटील या युती पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या