Friday, October 17, 2025
Homeक्राईममिसकॉलद्वारे इशारा मिळताच शहरातील कुंटणखान्यावर छापा ; तिघांना अटक!

मिसकॉलद्वारे इशारा मिळताच शहरातील कुंटणखान्यावर छापा ; तिघांना अटक!

मिसकॉलद्वारे इशारा मिळताच शहरातील कुंटणखान्यावर छापा ; तिघांना अटक!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील न्यू स्टेट बैंक कॉलनीमध्ये भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर रविवारी (१० ऑगस्ट) रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून कुंटणखाना चालविणाऱ्या दिनेश संजय चौधरी (३५, रा. राधाकृष्ण नगर, दूध फेडरेशन) व त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) (४२, रा. देवेंद्र नगर, ह.मु. न्यू स्टेट बैंक कॉलनी) यांच्यासह तीन तरुणांना ताब्यात घेतले.
न्यू स्टेट बँक कॉलनीत एक दाम्पत्य भाड्याने घेतलेल्या घरामध्ये कुंटणखाना चालवित असल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी पोउनि सचिन रणशेवरे, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, मनोज सुरवाडे, विनोद सुर्यवंशी, रेवानंद साळुंखे, योगेश बारी यांना कारवाईसाठी पाठविले. पोलिसांनी पाठविलेल्या डमी ग्राहकाला खात्री होताच त्याने मिसकॉलद्वारे इशारा दिला. त्यानुसार सापळा रचून बसलेल्या पथकाने कुंटणखाना सुरु असलेल्या दोन मजली इमारतीवर छापा टाकला. यावेळी घर मालक दिनेश चौधरी व त्यांची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) यांच्यासह तीन तरुण सापडले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुंटणखाना चालविणारे दाम्पत्य पश्चिम बंगाल येथील तरुणीला जास्त पैशांचे अमिष दाखवून तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. घरातून पैशांसह काही साहित्य पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी भरवस्तीमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या दिनेश चौधरी व त्याची पत्नी यमूना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या