Thursday, January 29, 2026
Homeक्रीडाजळगावमध्ये देहव्यवसायाचा थरार; पोलिसांनी छापा टाकून केली मोठी कारवाई !

जळगावमध्ये देहव्यवसायाचा थरार; पोलिसांनी छापा टाकून केली मोठी कारवाई !

जळगावमध्ये देहव्यवसायाचा थरार; पोलिसांनी छापा टाकून केली मोठी कारवाई !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. एच सेक्टरमधील ‘हॉटेल तारा’ येथे ही धाड टाकण्यात आली असून, या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलचा मालक आणि दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार, मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने (AHTU) ही कारवाई केली. बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवून, त्याने खोलीत गेल्यानंतर निश्चित केलेल्या सिग्नलप्रमाणे लाईट दोन वेळा बंद आणि सुरू करण्यात आले. ठरल्याप्रमाणे सिग्नल मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकत तिथून तीन महिलांची मुक्तता केली.हॉटेलमधील ही बेकायदेशीर गतिविधी थांबवण्यासाठी पोलिसांनी घेतलेली ही मोठी कारवाई असून, पीडित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यासोबत समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हॉटेलचा मालक व ग्राहकांची चौकशी सुरू असून, यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि गृह उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, विठ्ठल फुसे, रवींद्र गायकवाड, निलिमा सुशीर, हवालदार दीपक पाटील, भूषण कोल्हे, मनीषा पाटील आणि वाहिदा तडवी यांचा समावेश होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. शहरात होत असलेल्या अशा अनैतिक कारवायांवर पोलिसांकडून सुरू असलेली ही निर्णायक कारवाई नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या