Sunday, February 8, 2026
Homeजळगावराज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुनम विजय फालक सन्मानित

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुनम विजय फालक सन्मानित

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका, समाजसेविका आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या सौ.पुनम विजय फालक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने भुसावळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्रभैया पाटील,पाचोरा बाजार समितीचे संचालक शालीग्राम मानकर,संस्थाध्यक्षा संदिपा वाघ,सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्ष मनिषा चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्त्या मनिषा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्रीमती फालक गेली १३ वर्षे ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये सेवा बजावत असून त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.यापूर्वीही त्यांना पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नेहमीच नवनवीन उपक्रम राबवतात. शिक्षणाबरोबरच त्या सामाजिक कार्य, आयुर्वेदाचा प्रचार,धार्मिक कार्यक्रमांतील सहभाग तसेच जीवदया यामध्येही सक्रीय आहेत.विशेष म्हणजे त्यांनी अलीकडेच आपल्या संपूर्ण कुटुंबासह मांसाहार त्यागाचा संकल्प करून समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले आहे.

या सन्मानाबद्दल ताप्ती पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षकवर्ग,शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, जयलक्ष्मी अकॅडमी व फालक कुटुंबीयांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.संस्थेच्या प्रमुख सौ.संदीपा वाघ आणि ज्ञानेश्वर वाघ यांनी या पुरस्काराचा गौरव करताना सांगितले की,श्रीमती फालक यांच्यासारख्या गुणवंत व कार्यशील शिक्षिकेला पुरस्कार देताना संस्थेला अभिमान वाटतो.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या